Last Updated: Wednesday, March 28, 2012, 17:13
www.24taas.com, मुंबई 
बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार स्वत:ला जरी बाथरूम सिंगर म्हणतं असला तरी त्यानी एका कार्यक्रमात त्याचा आगामी सिनेमा हाऊसफुल्ल - 2 मधील अभिनेत्रींसाठी ‘भीगे होठ तेरे’ हे गाणं गायलं आहे..
अक्षय सोबत असणाऱ्या अभिनेत्री जॅकलीन फर्नाडिस, अशिन थोट्टूमकल, जरीन खान आणि शजान पद्मसी यादेखील या सोहळ्यात हजर होत्या. आणि याचवेळी अक्षयने यासगळ्यासांठी हे गाणं गायलं आहे. त्याने त्याचं आवडतं रोमांटीक गाणं भीगे होठ तेरे हे गाणं गायल्यानंतर इतर साऱ्या अभिनेत्री मात्र चांगल्याच खूश झाल्या.
अक्षय म्हणाला की, जर माझे सिनेमा चालेनासे झाले तर मी गायक होईन, पण मी फार खराब गाणी गातो, मी एक बाथरूम सिंगर आहे, पण काय करू मला गायला फार आवडतं, मी विचार करतो की, भारतात तसेही खूप सारे बाथरूम सिंगर आहेतच.
First Published: Wednesday, March 28, 2012, 17:13