उद्या बॉक्स ऑफिसवर 'थ्रिलर्स'ची मेजवानी - Marathi News 24taas.com

उद्या बॉक्स ऑफिसवर 'थ्रिलर्स'ची मेजवानी

www.24taas.com, मुंबई
 
या वीकेण्डला बॉक्सऑफीसवर थ्रिलरची मेजवानी पाहायला मिळणार आहे. महेश भट्ट निर्मित ‘ब्लड मनी’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे तर ‘बंबू’ हा कॉमिक थ्रिलरदेखील भेटीला येत आहे.यासोबत ‘चिरगूट’ हा मराठी सिनेमा प्रदर्शित होत आहे.
 
‘ब्लड मनी’ हा महेश भट्ट निर्मित थ्रिलर शुक्रवारी प्रदर्शित होतोय. कुणाल खेमू आणि अमृता पुरी ही जोडी यात झळकतेय. एका महत्वाकांक्षी तरुणाची कथा यात साकारली आहे. भट्ट कॅम्पच्या या नव्या सिनेमाचं भवितव्य काय हे तिकिटखिडकीवर कळेलच. यासोबत ‘बंबू’ का एक मल्टिस्टारर सिनेमादेखील प्रदर्शित होतोय. एकही बडा स्टार नसलेला हा कॉमिक थ्रिलर बॉक्सऑफीसवर यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे.
 
यासोबत चिरगुट हा मराठी सिनेमादेखील प्रदर्शित होतोय. उपेंद्र लिमये,चिन्मय मांडलेकर आणि सिया पाटील हे सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. एकंदर हा वीकेण्ड थ्रिलर्सने भरलेला आहे. मात्र आता प्रेक्षकांना थ्रिलिंग अनुभव मिळतो का ते उद्या कळेल.
 
 

First Published: Thursday, March 29, 2012, 18:45


comments powered by Disqus