Last Updated: Friday, March 30, 2012, 16:07
www.24taas.com, मुंबई कॅनडाची पॉर्न स्टार सनी लियॉन सध्या जिस्म-२ या महेश भट्ट यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मुंबईत आहे. या चित्रपटासाठी हॉट सनीने नवा लूक केला आहे. सनीने याचा एक फोटो सोशल नेटवर्कींग साइट ट्विटरवर ट्विट केला आहे.
ट्विटरवर हा फोटो पोस्ट केल्यानंतर सनीने या फोटोबद्दल काही माहितीही दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये सनी म्हणाली, हा फोटो जिस्म-२ च्या चित्रिकरणादरम्यान काढण्यात आला असून चित्रपटातील अनेक लूक पैकी एक लूक असाही असणार असल्याचे तीने म्हटले आहे. हा फोटो पोस्ट केल्यानंतर मी कोणत्याही अडचणीत सापडणार नाही. ही ही ही......
यापूर्वीही सनीने आपले अनेक फोटो ट्विटरवर अनेकदा पोस्ट केले आहेत. त्यातील तिचा साडीमधील लूक खूपच फेमस झाला होता.
सनीला या चित्रपटाची ऑफर बीग बॉस शो दरम्यान महेश भट्ट यांनी दिली होती. त्यामुळे तो चित्रपट पूर्ण करण्यासाठी ती भारतात दाखल झाली आहे.
First Published: Friday, March 30, 2012, 16:07