सनी लियोनचा 'जिस्म-२'साठी नवा लूक - Marathi News 24taas.com

सनी लियोनचा 'जिस्म-२'साठी नवा लूक


www.24taas.com, मुंबई
 
 
कॅनडाची पॉर्न स्टार सनी लियोनचा 'जिस्म-२'साठी नवा लुक असणार आहे. जिस्म-२ हा सिनेमा पुजा भट्ट करीत आहे. त्यासाठी सनी लियोन मुंबईत दाखल झाली आहे. सनी लियोनने आपले जरा हटके छायाचित्र ट्विटर वर पोस्ट केले आहे. सनीने आपली प्रतिमा बदलण्यासाठी हा सारा खटाटोप केलेला दिसत आहे.
 
 
'जिस्म-२'च्या शुटींग दरम्यान हा फोटो काढण्यात आला आहे. यातून सनीने वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.  या आधी सनी लियोनने पारदर्शक साडीतील फोटो ट्विटरवर टाकला होता. त्यामुळे 'जिस्म-२'ची चर्चा सुरू झाली.या फोटोवरूनच हा चित्रपट हॉट असणार असे मत निर्माण झाले होते. कारण सनी लियोन ही पॉन स्टार असल्याने तिचा चित्रपटासाठी हॉट वापर होण्याची शक्यता होती. मात्र, आता तर सनीचा फोटो स्टाईलीश असल्याने या चित्रपटात नेमके काय असणार याची उत्सुकता लागली आहे.
 
 
सनी लियोनने आपली छबी चांगली असल्याचे दाखवून दिल्याचे या फोटोवरून तरी सध्या तरी दिसत आहे. या फोटोच्यामाध्यमातून तशी तिने खबरदारी घेतल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी तिने ट्विटरवर फोटो पोस्ट केल्याचे बोलले जात आहे. या आधी उत्तेजीत फोटो सनीने ट्विटर  लोड केले होते. सनी लियोन ही भारतात बिग बॉस-५ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली होती. तेव्हापासून ती चर्चेत आहे.
 
 
 
 

First Published: Saturday, March 31, 2012, 12:21


comments powered by Disqus