मी पॉर्न फिल्म सोडू शकत नाही - सनी - Marathi News 24taas.com

मी पॉर्न फिल्म सोडू शकत नाही - सनी

www.24taas.com
 
सनी लिऑन म्हणजे पॉर्न स्टार अशी आपल्यासमोर तिची इमेज असते. अनेक वादानंतर कॅनडा पॉर्न स्टार सनी लिऑनने स्पष्ट केले आहे की, आपल्या जिस्म-२ नंतरच्या शूटींगनंतर आपण पॉर्न फिल्म करीत राहणार आहोत. सध्या सनी भारतातील जिस्म-२ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.
 
सनीने एका वृत्तपत्राला मुलाखत देताना म्हटलं की, जेव्हापासून मी बिग बॉसमध्ये आले तेव्हापासून मी एकही पॉर्न फिल्म केलेली नाही. पण याचा अर्थ असा नाही की, मी पॉर्न फिल्म इंडस्ट्रीला अलविदा केला आहे. सनीने म्हटलं आहे की मी अजूनही पॉर्न फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा विचार केलेला नाही. जिस्म-२ मध्ये काम करणं म्हणजे असं नाही की, बॉलिवूड मध्ये मला दरवेळेसच काम मिळेल.
 
पॉर्न फिल्म मध्ये काम करणाऱ्या सनीने पुन्हा एकदा पॉर्न  फिल्मकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे तिचं अस ं म्हणणं आहे की, पॉर्न फिल्ममध्ये काम करणं ही माझ्यासाठी लज्जास्पद गोष्ट नाहीये... ते माझं काम आहे.
 
 
 
 
 
 

First Published: Sunday, April 1, 2012, 18:15


comments powered by Disqus