शब्दाचा मान राखणारा सलमान - Marathi News 24taas.com

शब्दाचा मान राखणारा सलमान


झी २४ तास वेब टीम, मुंबई 
 
सलमान खानने लागोपाठ हिट दिले असले आणि तो सध्या बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत असला तरी तो एक सच्चा मित्र असल्याचं त्याने दाखवून दिलं आहे. बॉलिवूडमधले दिग्गज सुभाष घई यांनी कर्ज, रामलखन, ताल, खलनायक आणि विधाता यासारखे मेगा हिट सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं असलं तरी सध्या त्यांचा पडझडीचा काळ सुरु आहे. घईंचे किसना आणि युवराज हे दोन सिनेमे लागोपाठ बॉक्स ऑफिसवर आपटले. आणि या कठिण कालखंडात त्यांनी सलमानकडे मदत मागितली.
 
सलमानने घईंबरोबर सिनेमा साईन केला आणि पुढच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याचे शुटिंग सुरु होणार आहे. सलमानने माझ्या सिनेमात काम करण्याचे वचन दिलं होतं आणि पुढच्या वर्षी २४ ऑक्टोबरला त्याचे शुट सुरु होणार आहे. ए.आर.रहमान घईंच्या सिनेमाला संगीत देणार आहे. सलमानचं मन मोठं आहे आणि त्याने स्क्रिप्ट आवडल्यास माझ्या सिनेमात काम करण्याचा शब्द दिला होता, तो त्याने पाळला असं घई म्हणाले. सलमानने मला खुप मोठं पाठबळ दिलं असल्यचं तसंच हा सिनेमा यशस्वी होईल असा विश्वासही घई यांनी व्यक्त केला आहे. सलमान आपल्या जवळच्या माणसांसाठी सर्वतोपरी मदत करतो हे त्याने याआधीही अनेकवार दाखवून दिलं त्याचाच प्रत्यय आला आहे.

 

First Published: Friday, November 18, 2011, 11:45


comments powered by Disqus