अमिताभ हा एकमेव सुपरस्टार- रजनीकांत - Marathi News 24taas.com

अमिताभ हा एकमेव सुपरस्टार- रजनीकांत

www.24taas.com, लंडन
 
अमिताभ बच्चन हा एकमेव सुपस्टार आहे हे विधान दुसऱ्या तिसऱ्या कुणी केलं नसून खुद्द ऑल टाईम ग्रेट रजनीकांतनं केलं आहे. रजनीकांतच्या यशोगाथेने अनेक विक्रमांची नोंद केली असली आणि त्याचे चाहते जगभरात पसरले असले तरीही त्याला अमिताभ हा एकमेव सुपरस्टार आहे असं वाटतं. रजनीकांत कोचादियाँ या त्याच्या आगामी सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी लंडनमध्ये आहे.
 
माझ्यासाठी प्रत्येक सिनेमा हा मला पहिल्या सिनेमासारखाच वाटतो. मी दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या बाबतीत अत्यंत चोखंदळ आहे असं रजनीकांत म्हणाला. चंद्रमुखी, शिवाजी आणि रोबोट यासारखे मेगाहिटस देत वयाच्या ६१ व्या वर्षीही आपला करिष्मा रजनीकांतने कायम असल्याचं दाखवून दिलं आहे. कोचादियाँची निर्मिती रजनीकांतची मुलगी सौंदर्याने केली आहे. कोचादियाँचे संगीत ए.आर.रहमानने दिलं आहे आणि दिवाळीत तो प्रदर्शित होईल. कोचादियाँमध्ये रजनीकांतने २१ वर्षानंतर गाणं गायलं आहे.

First Published: Monday, April 2, 2012, 07:55


comments powered by Disqus