असं काय म्हणाला जॉन.. अक्षयबाबत - Marathi News 24taas.com

असं काय म्हणाला जॉन.. अक्षयबाबत

www.24taas.com, मुंबई
 
गरम मसाला आणि देसी बॉईज नंतर हाऊसफुल- २ मध्येही जॉन अब्राहम आणि अक्षय कुमार यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहता येणार आहे. टिपीकल साजिद खान फिल्म असलेल्या या सिनेमाचं प्रमोशन जॉन जोरदार करतो आहे.
 
हाऊस फुल - 2 कॉमेडी कॉमेडी आणि कॉमेडीचाच मसाला या सिनेमात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात जॉन अब्राहमसह अक्षय कुमार, रितेश देशमुख या यंगस्टर्स बरोबरंच रणधीर आणि ऋषी कपूर तसंच मिथुन चक्रवर्ती आणि बोमन इराणी हे सिनीयर स्टार्संही आहेत. आणि या स्टार्समध्येही सगळ्यात मस्ती करणारी जोडी म्हणजे कपूर ब्रदर्सची जोडी असं जॉन अब्राहमनं सांगितलं आहे.
 
सिनेमाच्या इतर कलाकारांप्रमाणेच जॉनची केमिस्ट्री जमली आहे ती अक्षय कुमारसह. गरम मसला आणि देसी बॉईज नंतरचा अक्षयसोबतचा जॉनचा हा तिसरा सिनेमा आहे. त्यामुळे या केमिस्ट्रीची जादू प्रेक्षकांना अनुभवता येईल असंच जॉन सांगतो.
 
 
 
 
 
 

First Published: Tuesday, April 3, 2012, 19:35


comments powered by Disqus