विद्या बालन बॉक्स ऑफिसवर डॉन ठरणार का? - Marathi News 24taas.com

विद्या बालन बॉक्स ऑफिसवर डॉन ठरणार का?

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
विद्या बालनचा द डर्टी पिक्चर, अक्षय-जॉन अब्राहाम देसी बॉईज आणि शाहरुख खानचा डॉन 2 हे तीन सिनेमे वर्षा संपता संपता प्रदर्शनाच्या वाटेवर आणि चर्चेत आहेत. रणबीर कपूरच्या रॉकस्टार बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश न मिळाल्याने निराशेचं वातावरण आहे. पण या क्षेत्रातील जाणकारांनी डर्टी पिक्चर बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करून दाखवेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
 
सिल्क स्मिता या दाक्षिणात्य हॉट भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या वादग्रस्त आयुष्यावर बेतलेला डर्टी पिक्चर हिट होण्याची शक्यता आहे यात नवल ते काय? हे तर काहीच नाही जाणकरांच्या मते शाहरुखच्या डॉनच्या तुलनेत डर्टी पिक्चर अधिक व्यवसाय करेल. डॉनच्या तुलनेत डर्टी पिक्चरचे बजेट खुपच कमी आहे. देसी बॉईजचे कथानक कुटुंबाला आवडेल असं आहे. त्यामुळे या तिन्ही सिनेमांमध्ये डर्टी पिक्चरला जाणकरांनी अधिक पसंती दिली आहे.
 
डर्टी पिक्चरचा दिग्दर्शक मिलन लुथ्रिया म्हणाला कि आता पर्यंत प्रतिसाद उत्तम आहे. आता येत्या दीड महिन्यात शाहरुख, अक्षय आणि जॉनच्या तुलनेत विद्या बालनची बोल्ड सिल्क स्मिता प्रेक्षकांना अधिक भावते का ते पाहायचं.

First Published: Saturday, November 19, 2011, 11:30


comments powered by Disqus