ताऱ्यांची भेट : अमिताभ आणि रजनीकांत - Marathi News 24taas.com

ताऱ्यांची भेट : अमिताभ आणि रजनीकांत

www.24taas.com, चेन्नई
 
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)च्या उद्घाटनासाठी चेन्नई येथे गेले असता, त्यांनी दक्षिणेचे मेगास्टार ‘रजनीकांत’ यांची भेट घेतली.. रजनीकांत यांची तब्येत बरी झालेली पाहून अमिताभ यांनी आनंद व्यक्त केला.
 
बच्चन यांनी ट्विटर वर लिहीलं आहे, “रजनीकांत मला माझ्या रुमवर भेटायला आले. त्यांना भेटून खूप आनंद झाला. त्यांची प्रकृती सुधारली असल्याचं जाणवलं. याबद्दल देवाचे लाख लाख आभार.  रजनीकांत यांच्या वरोबर वेळ घालवण्यात नेहमी आनंद मिळतो.”
 
रजनीकांत गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे.  त्यांच्या फुफ्फुसांना जंतूसंसर्ग झाला होता. नंतर  त्यांची किडनी काम करेनाशी झाली. त्यानंतर रजनीकांत यांना चेन्नईतून सिंगापूरमध्ये हलवण्यात आलं होतं. पण आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

First Published: Wednesday, April 4, 2012, 15:21


comments powered by Disqus