Last Updated: Wednesday, April 4, 2012, 15:59
www.24taas.com, मुंबई जिस्म-२ मधून बॉलिवूड मध्ये अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण करायला आलेल्या सनी लिऑनला जरी चांगली फिल्म, दिग्दर्शक, निर्माते मिळाले असले, तरी तिच्या नावाला असलेला पॉर्न स्टारचा टॅग काही केल्या कुणी विसरत नाहीये. पण, सनीला सुद्धा आपली ‘ती” इमेज सोडवत नाहीये. म्हणून तर ती ट्विटरवर आपल्या फॅन्सना वारंवार या गोष्टींची आठवण करून देतेय.
पण, जिस्म-२चा सह-निर्माता असणाऱ्या दिनो मोरियाला मात्र या गोष्टीवर आक्षेप आहे. एका मुलाखतीत दिनो मोरियाने ही गोष्ट स्पष्ट केली. यामध्ये तावातावाने बोलताना दिनो म्हणाला, की सनीला पॉर्न स्टार म्हणणं अयोग्य आहे. पॉर्न स्टार असणं हा तिचा भूतकाळ होता. आणि ती आता बॉलिवूडमधली हिरॉइन म्हणून नाव कमवायला आली आहे. ती ज्या देशातून आली आहे, तिथे पॉर्न हे अश्लील मानलं जात नाही. त्यामुळे सनीने काहीही वाईट केलेलं नाही. त्यामुळे इथे तिला आता पॉर्न स्टारम्हणून संबोधणं बंद करा.
दिनो मात्र सनीवर फिदा झाल्याचं दिसून येत आहे. दिनो सनीबद्दल भरभरून बोलतो. तो म्हणाला, “सनी अत्यंत सुंदर स्त्री आहे. ती इतकी आकर्षक आहे, की कुणीही तिच्या प्रेमात पडेल. बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना ती आपल्या कामावर खूप मेहनत घेत आहे.” दिनो आता इतका सनीवर मोहित झालाय, की त्याला सनी विरोधात काढलेलं एकही अवाक्षर खपत नाही. तेव्हा, सनी स्वतः जरी आपल्या ‘पॉर्न स्टार’ इमेजला सोडायला तयार नसली, तरीही तिला ‘पॉर्न स्टार’ म्हणू नका, बरं का !
First Published: Wednesday, April 4, 2012, 15:59