Last Updated: Thursday, April 5, 2012, 13:28
www.24taas.com 
सिनेमासाठी लूक चेंज करणं हा ट्रेंड आता मराठी सिनेसृष्टीतंही रुजू लागला आहे. आता नव्याने येत असलेल्या 'गुलाम बेगम बादशाह' या सिनेमाबद्दलच पाहा ना. या सिनेमात संजय नार्वेकर आणि नेहा पेंडसे यांनी आपला लूकच चेंज केला आहे.
गुलाम बेगम बादशाह या सिनेमासाठी संजय नार्वेकरंने फंकी लूक साकारला आहे. विशेष म्हणजे संजय अशा लूकमध्ये आजवर स्क्रीनवर कधीच वावरला नाही. त्यामुळे त्याच्या फॅन्स साठी त्याचा हा सिनेमा एक सरप्राईज असेल. संजयच्या यालूकचं गुपित त्याच्या व्यक्तिरेखेतंच दडलेले आहे असं खुद्द संजयनेच सांगितले आहे.
तर संजयची कोस्टार असेलली नेहा पेंडसे नेहमीच आपल्याला ग्लॅमरस आयटम नंबर्स मध्ये पहायला मिळाली आहे. मात्र या सिनेमात ती अगदी वेगळ्या लूक मध्ये दिसणार आहे. या सिनेमात नेहा एका स्ट्रगलिंग अभिनेत्रीची व्यक्तिरेखा साकारणार आहे...
गुलाम बेगम बादशाह नावावरुन सिनेमा काहीसा वेगळा असेल याचा अंदाज येतोच आहे. सिनेमातले कलाकारांचे हटके लूक्स पाहून सिनेमा नक्कीच हटके असेल अशी आशा करायला सध्या तरी हरकत नाही.
First Published: Thursday, April 5, 2012, 13:28