'शांघाय' येतोय जूनमध्ये - Marathi News 24taas.com

'शांघाय' येतोय जूनमध्ये

www.24taas.com, मुंबई
 
‘खोसला का घोसला’ आणि ‘ओये लकी लकी ओये’ या दर्जेदार फिल्म्सनंतर आता दिबाकर बॅनर्जी यांची ‘शांघाई’ ही नवी फिल्म लवकरच आपल्या भेटीला येतेय. अभय देओल,कलकी,इम्रान हश्मी अशी हटके स्टारकास्ट या सिनेमात दिसतेय.जूनमध्ये हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय.
 
यात अभय देओल आयएएस ऑफीसरच्या भूमिकेत झळकतोय तर इम्रान हश्मी लग्नाचे व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या सामान्य माणसाच्या भूमिकेत दिसतोय. दोघांचेही लूक्स यात हटके दिसत आहेत. तर कल्की एका विद्यार्थिनीची भूमिका साकारताना दिसतेय.
 
एकंदर शांघाई हा पॉलिटिकल थ्रिलर फर्स्ट लूकमधून तरी प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यात यशस्वी झालाय असंच दिसतंय.

First Published: Saturday, April 7, 2012, 12:27


comments powered by Disqus