अभिनेत्री सायली भगत जखमी - Marathi News 24taas.com

अभिनेत्री सायली भगत जखमी

www.24taas.com, नवी दिल्ली
 
 
ग्रेटर नोएडामधील एका मॉलच्या उदघाटनालाच गालबोट लागलं. मॉलच्या उदघाटनानंतर एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झालाय. एडव्हेंचर स्पोर्टस दरम्यान दोरी तुटल्याने ही व्यक्ती खाली पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
 
 
या कार्यक्रमात थरारक प्रात्यक्षिके करताना प्रशिक्षक शैलेंदर सिंह बिश्त या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर या कार्यक्रमातअभिनेत्री सायली भगत सहभागी झाली होती. याच म़ॉलमध्ये दुस-या एका  दुर्घटनेत अभिनेत्री सायली भगत स्टंट करताना जखमी झालीय. सायली भगतने एका रेसिंगमध्ये भाग घेतला होता. दुर्घटनेमुळं मॉल बंद ठेवण्यात आला असला तरी याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

First Published: Saturday, April 7, 2012, 23:01


comments powered by Disqus