मधुर भंडारकर बलात्कार खटला चालवू नका - Marathi News 24taas.com

मधुर भंडारकर बलात्कार खटला चालवू नका

www.24taas.com
 
मॉडेल प्रीती जैन बलात्कार प्रकरणात निर्माता दिग्दर्शक मधुर भंडारकरला अखेर सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. मधुरच्या विरोधात बलात्काराचा खटला चालवण्यास तूर्तास मनाई करण्यात आली आहे.
 
वेगळ्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या निर्माता दिग्दर्शक मधुर भंडारकर याला सुप्रीम कोर्टाकडून थोडा दिलासा मिळाला आहे . मॉडेल प्रीती जैन बलात्कार प्रकरणी मधुरविरोधात खटला चालवण्यास तूर्तास सुप्रीम कोर्टानं मनाई दिली आहे.
 
यापूर्वी मुंबई महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी भंडारकर विरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले होते. मुंबई हायकोर्टानंही याच निर्णयावर शिक्कामोर्तब केलं होतं. दुसरीकडं मधुरला मिळालेला हा तात्पुरता दिलासा असल्याचं प्रीती जैनच्या वकिलांचं म्हणणं आहे.
 
मधुरविरोधात हा खटला गेल्या सात वर्षांपासून सुरु आहे. प्रीती जैनने केलेले आरोप खोटे असल्याचा रिपोर्टही पोलिसांनी यापूर्वी एकदा कोर्टात दिला दिला होता, मात्र कोर्टाच्या आदेशानं पुन्हा चौकशी करण्यात आली, त्यात प्रीतीचे आरोपात तथ्य असल्याचं समोर आलं होतं, त्यानंर मधुरविरोधात बलात्काराचा खटला चालवण्याचे आदेश देण्यात आले होते. सध्या याप्रकणात मधुर भंडारकर जामिनावर आहे.
 
 
 
 

First Published: Monday, April 9, 2012, 22:19


comments powered by Disqus