इर्फानला साकारायचे आहेत 'ध्यानचंद' - Marathi News 24taas.com

इर्फानला साकारायचे आहेत 'ध्यानचंद'

www.24taas.com, मुंबई
 
पानसिंग तोमरमध्ये दमदार परफॉर्मंस दिल्यावर आता इर्फान खान आता भारतीय हॉकी टिमचे महान खेळाडू ध्यानचंद यांच्या जीवनावर आधारित सिनेमात ध्यानचंद यांचीच भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहे.
 
फिल्म पानसिंग तोमरची डीव्हिडी नुकतीच प्रकाशित झाली. याप्रसंगी इर्फान खानने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी इर्फान म्हणाला, “माझं असं स्वप्नंय की मी ध्यानचंदची भूमिका साकारावी. मी खरंतर आता त्या भूमिकेसाठी आवश्यक असणाऱ्या वयापेक्षा मोठा झालो आहे. तरीही जर मला कधी अशी संधी मिळाली तर, मी ध्यानचंद यांचं पात्र सादर करेन. ध्यानचंद अद्वितीय खेळाडू होते. आपल्या देशाला त्यांचा अभिमान वाटायला हवा.”
 
दरम्यान काल पत्रकारांशी बोलताना माजी भारतीय क्रिकेट कॅप्टन अझरुद्दिन यानेही ध्यानचंद यांना भारतरत्न मिळावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. “ध्यानचंद स्वातंत्र्यपूर्व काळात हॉकी खेळले होते. ते ही हॉकीचं योग्य शिक्षण मिळत नसताना, खेळण्यासाठी चांगली हॉकी स्टिक नसताना. त्यावेळी तर हॉकीची योग्य मैदानंही नव्हती. अशा काळात आणि परिस्थितीत ध्यानचंद यांनी संपादन केलेला विजय लक्षात घेतला, तर जाणवतं की ध्यानचंद हे महान खेळाडू होते आणि त्यांनाच आधी ‘भारतरत्न’ मिळावं.” असं अझरुद्दिन म्हणाला.

First Published: Sunday, April 15, 2012, 00:00


comments powered by Disqus