Last Updated: Monday, April 16, 2012, 18:27
www.24taas.com, मुंबई ‘सलमान खान म्हणजे राजा माणूस’ असं म्हणणारे फिल्म इंडस्ट्रीत कम नाहीत. आणि असं म्हणण्यामागे कारणही तसंच असतं. आपल्याला मदत करणाऱ्या वक्तीला सलमान असं काही खुश करतो, की बस रे बस!
करीनाला नुकताच या गोष्टीचा प्रत्यय आलाय. जेव्हा करीना कपूरने सलमानच्या ‘दबंग-२’मध्ये आयटम नंबर करायला होकार दिला, तेव्हाच तिला सलमान काहीतरी गिफ्ट देणार असई चर्चा रंगली होती. कारण, बेबोने या आयटम नंबरसाठी कुठलीही फी आकारली नव्हती आणि सलमानसाठी म्हणून तिने विनामूल्य काम केलं.
पण, सलमान काय गिफ्ट देणार याबद्दल कुणालाच काही माहित नव्हतं. पण, सलमानने आपल्या रुबाबाला साजेसंच गिफ्ट दिलं आहे. यूटीव्हीचे सिनीयर मॅनेजर पृथ्वीश गांगुली यांनी ट्विट केलं आहे, की सलमानने बेबोला एक 'BMW कार' गिफ्ट केली आहे.
आपल्या सहकाऱ्यांना महागडी गिफ्ट्स देणं हे बॉलिवूडमध्ये नवीन नाही. रा.वनमध्ये छोटीशी भूमिका केल्याबद्दल शाहरूखने संजय दत्त याला १५ लाख रुपयांची बाइक गिफ्ट दिली होती. ‘तीस मार खान’मध्ये डांस केल्याबद्दल अक्षय कुमारने सलमान खानच्या बिईंग ह्युमन संस्थेला मठ्या रकमेची देणगी दिली होती.
First Published: Monday, April 16, 2012, 18:27