Last Updated: Tuesday, April 17, 2012, 16:47
www.24taas.com, लाहोर काही भारतीय सिनेमांमध्ये काम केलेल्या पाकिस्तानी नटी मीरा हिच्याविरोधात पाकिस्तान कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ते ही गर्भपात केल्याच्या आरोपावरून...
विशेष जिल्हा आणि सेशन जज मोहम्मद आयुब खान यांनी अशा प्रकारची याचिका आल्याचं मान्य केलं आङे. मोहम्मद इस्लाम नामक एका व्यक्तीने ही याचिका दाखल करून मीरावर पोलीस कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
मीराने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपण अजूनही ‘व्हर्जिन’ असल्याचं म्हटलं होतं. पण तिने गर्भपात केला होता. हे बेकायदेशीर आणि गैर-इस्लामी असल्याचं इस्लाम यांनी म्हटलं आहे.यासाठी हुदूद कायद्यानुसार मीराची चौकशी करून तिच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी इस्लाम यांनी केली आहे. या कायद्यानुसार विवाहबाह्य संबंध आणि मद्यपान करणाऱ्यांस कडक शासन करण्यात येते.
मीराचे पाकिस्तानी अमेरिकन पायलट नावीद शेहझाद बरोबर अनैतिक संबंध असल्याचा आरोप पाकिस्तानी व्यापारी अतिकर रेहमान यांनी केला आहे. रेहमान यांनी आपण मीराचे पती असल्याचाही दावा केला आहे. त्यामुळे मीरा सध्या चांगलीच अडचणीत आली आहे. आता या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी म्हणून तिने भारताचा रस्ता धरू नये, म्हणजे मिळवलं.
First Published: Tuesday, April 17, 2012, 16:47