अभिनेत्री मिनाक्षीचं शीर कापून केली हत्या - Marathi News 24taas.com

अभिनेत्री मिनाक्षीचं शीर कापून केली हत्या

www.24taas.com, अलाहाबाद
 
मुंबई पोलिसांना अभिनेत्री मिनाक्ष ी थापाचं शीर कापलंले मृतदेह सापडला आहे, अलहाबादमधून अभिनेत्री मिनाक्षीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. मुंबई पोलिसांची टीम या हत्येतील आरोपी अमित जायस्वाल आणि प्रिती सरीनला घेऊन अलाहबादला पोहचली होती.
 
अलाहाबाद पोलीस अधिक्षक शैलेश यादव यांनी सांगितलं की, मुंबई पोलिसांनी मिनाक्षीचं शीर कापलेला मृतदेह तिच्या घराजवळील सेफ्टी टँकमधून ताब्यात घेण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी मिनाक्षी कापलेलं शीर अलाहाबाद - जौनपूर मार्गावर चालत्या बसमधून फेकून दिलं होतं. आता पोलीस त्या जागेचा शोध घेत आहेत. या हत्याकांडाबाबत आणखी पुरावे गोळा करण्यासाठी आरोपींना घेऊन अलाहाबादला आले. या आरोपींनी एक महिन्यापूर्वी मुंबईहून अलाहाबादला जाऊन हत्या केली.
 
पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी खंडणीच्या हेतूने अपहरण केले होते. प्रिती आणि अमित यांना वाटले की, मिनाक्षी नेपाळ मधील एखाद्या श्रीमंत घरातील असल्याने तिचे अपहरण करून मोठी खंडणी उकळता येईल. अमित आणि प्रिती मिनाक्षीला भोजपूरी सिनेमात काम देण्याच्या निमित्ताने अलाहाबादला आणले. आणि त्यानंतर तिचा खून केला.
 
 

First Published: Wednesday, April 18, 2012, 18:04


comments powered by Disqus