Last Updated: Wednesday, April 18, 2012, 22:46
www.24taas.com, मुंबई 'शाळा' या सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आणि सुजय डहाके याच्या दिग्दर्शनकौशल्याची सगळीकडे वाहवा झाली. आता उत्कंठा वाढली ती त्याच्या पुढील सिनेमाची. ‘आजोबा’ ही सुजयची नवी फिल्म आहे.
शाळा सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या सुजय डहाकेची नेक्स्ट फिल्म कोणती असेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पहिल्याच सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर उमटवलेल्या या गुणी दिग्दर्शकाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत. त्यातच महेश मांजरेकर यांनी त्यांच्या आगामी ‘श्यामची आई’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सुजयवर टाकली आहेच...
अशातच सुजयची नवी फिल्म येऊ घातलीय. याचं पोस्टर नीट पाहा...आजोबा ही सुजयची नवी फिल्म आहे...एका वाघाची ही चित्तथरारक कहाणी भासतेय. सुजयच्या नव्या फिल्मचं हे पोस्टर नक्कीच उत्कंठा वाढवणारं आहे...पण कथानक काय असेल हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे..याबाबत सुजयला विचारता इतक्यात काहीच सांगणार नसल्यातं त्याने सांगितलं . सोशल नेटवर्किंग साईटवर मात्र सुजयच्या या नव्या सिनेमाची चर्चा चांगलीच रंगतेय...आजोबा या सुजयच्या सिनेमात कोण कलाकार झळकणार आहेत हे लवकरच कळेल.
First Published: Wednesday, April 18, 2012, 22:46