कतरिनामुळे संगणकही घायाळ - Marathi News 24taas.com

कतरिनामुळे संगणकही घायाळ

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
कतरिना कैफ लाखोंच्या दिल की धडकन असल्याचा किताब मिरवते पण सायबर विश्वात तिची ओळख सर्वात धोकादायक इंडियन सेलिब्रिटी अशी आहे. सायबर गुन्हेगार तिच्या नावाचा वापर फेवरिट की-वर्ड म्हणून करतात आणि त्यामुळे सर्च इंजिनवर कतरिनाच्या नावाने शोध घेणाऱ्यांच्या कॉम्प्युटर्सना हानी पोहचते.







मॅकएफी या इंटरनेट सिक्युरिटी कंपनीच्या २०११ सालच्या रिपोर्टनुसार भारतीय सायबर विश्वात कतरिना कैफचा उदय धोकादायक सेलिब्रिटी म्हणून झाला आहे. कैतरिनाचे फॅन्स सर्च इंजिनवर फ्री डाऊनलोड, हॉट पिक्चर, स्क्रिन सेवर आणि व्हिडिओचा शोध घेतात पण त्यामुळे ऑनलाईन धमकी तसंच खराब सॉफ्टवेअरमुळे त्यांच्या कॅम्प्युटर्सला हानी पोहचू शकते.  मॅकएफीने केलेल्या संशोधनातून सगळ्यात धोकादायक इंडियन सेलिब्रिटी कतरिना कैफ असल्याचं समोर आलं आहे. सायबर विश्वातले गुन्हेगार लोकप्रिय कलाकार, खेळाडू आणि राजकारण्यांच्या नावाचा वापर लोकांना भूरळ घालण्यासाठी करतात आणि अशा वेबसाईटवर असलेल्या खराब सॉफ्टवेअरमुळे कॅम्प्युटर्सचे नुकसान होऊ शकते. या यादीत दीपीका पदुकोण, जॉन अब्राहाम, आमीर खान, ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान यांचाही समावेश आहे. पण या सर्वांच्यात कतरिनाने बाजी मारली. एका अर्थाने लाखो के दिल की धडकन असलेली कतरिनामुळे संगणकांना दिल का दौरा पडू शकतो नाही का?

First Published: Wednesday, November 23, 2011, 16:42


comments powered by Disqus