"जिस्म-२ ने माझं स्वप्न पूर्ण केलं "- सनी - Marathi News 24taas.com

"जिस्म-२ ने माझं स्वप्न पूर्ण केलं "- सनी

www.24taas.com, नवी दिल्ली
 
सनी लिऑन सध्या प्रचंड खुश आहे. जिस्म-२चं शुटिंग झाल्यापासून आपलं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झाल्याचं सनी सगळ्यांना सांगत आहे.“मला किती आनंद झालाय हे मी शब्दांत नाही सांगू शकत. मी कधी कल्पनाही केली नव्हती, की मी कधी बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून काम करेन. पण, हे प्रत्यक्षात घडतंय. आणि मी प्रचंड एक्साइटेड आहे.” असं सनी म्हणाली.
 
तसंच, “माझं जिस्म-२चं पोस्टर पाहून गोंधळून जाऊ नका. जिस्म-२ सिनेमा खूपच वेगळा आहे. यात केवळ अंगप्रदर्शन नसून जबरदस्त कथानकही या सिनेमाला आहे.” असं सनीनं सांगितलं.
 
“मी गेली कित्येक वर्षं अशा संधीची वाट पाहात होते. आणि माझं हे स्वप्न पूर्ण होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं.पण, भट्ट सर घरी आले, त्यांनी मला पूजा भट्ट आणि आपल्या सिनेमाबद्दल सांगितलं. जिस्म-२ चं कथानक अतिशय घट्ट बांधलेलं आहे. ते अत्यंत वेगवान आहे आणि सिनेमा बघताना प्रेक्षक खुर्चीला खिळून राहातील आणि आता पुढे काय होणार अशी उत्कंठा त्यांना सतत लागून राहील, याची मला खात्री आहे. माझं या सिनेमातील कॅरेक्टर वेगवेगळ्या घटनांमध्ये अडकतं. आणि काय चूक काय, बरोबर.. आयुष्य कसं जगावं आणि कसं जगू नये.. यावर भाष्य करतं.” असं या सिनेमाबद्दल सनीने सांगितलं आहे.
 
 

First Published: Thursday, April 19, 2012, 17:00


comments powered by Disqus