सुभाष घईंचा आणखी एक कारनामा.... - Marathi News 24taas.com

सुभाष घईंचा आणखी एक कारनामा....

www.24taas.com, नागपूर
 
मुंबईत सुभाष घईंचं व्हिसलिंग वूड्स गोत्यात सापडलं असतानाच नागपुरातही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. नागपूर एमआयडीसीत व्हिसलिंग वूड्सच्या फ्राईंनचिसी असलेल्या नागपूर फिल्म अकादमीची इमारत सर्व नियम धाब्यावर बसवून उभारल्याची माहिती उघडकीस आली आहे.
 
त्यामुळं व्हिसलिंग वूड्सला सरकारपातळीवर बऱ्याच ठिकाणी मेहेरबानी होत असल्याचा हा प्रकार 'झी २४ तास'नं उघडकीस आणला आहे. सुभाष घईंच्या व्हिसलिंग वूड्सशी ही अकादमी संलग्न असून इथेही फिल्म प्रशिक्षण विषयक अभ्यासक्रम चालवले जातात.
 
मात्र, अकादमीची इमारत नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आली आहे. याबाबत औद्योगिक विकास महामंडळाने अकादमीला नोटीसही पाठवली होती. मात्र, अजून तरी याबाबत ठोस कारवाई झालेली नाही.
 
 
 
 

First Published: Friday, April 20, 2012, 08:10


comments powered by Disqus