Last Updated: Friday, April 20, 2012, 08:19
www.24taas.com, मुंबई 
नितीन चंद्रकांत देसाई दिग्दर्शित अजंठा या बहुचर्चित फिल्मचं म्युझिक लॉन्च मुंबईत एका शानदार कार्यक्रमात पार पडलं. अजिंठा सिनेमाची टीम यावेळी हजर होती. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने या सिनेमात पारोची भूमिका साकारली आहे.
म्युझिक लॉन्चला सोनाली त्याच रुपात हजर होती. मराठी इंडस्ट्रीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी आवर्जून हजेरी लावली. नटरंगमध्ये अप्सरा साकारल्यानंतर सोनाली कुलकर्णी आता आदिवासी मुलीच्या रुपात पडद्यावर झळकणार आहे.
अजिंठा सिनेमात सोनाली पारोच्या भूमिकेत दिसणार आहे. मुंबईतल्या म्युझिक लॉन्चवेळी सोनालीने पारोची झलक पेश केली. पारोची दिलखेचक अदाने उपस्थित मात्र चांगलेच घायाळ झाले.
First Published: Friday, April 20, 2012, 08:19