येता शुक्रवार मराठी-हिंदी फिल्म्सनी सज्ज! - Marathi News 24taas.com

येता शुक्रवार मराठी-हिंदी फिल्म्सनी सज्ज!

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
या विकेन्डला अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम हे बॉलिवूडचे दोन हॅन्डसम ड्युड 'देसी बॉईज' बनून आपल्या भेटीला येण्यास रेडी झालेत. आणि फक्त हे देसी बॉईजच नाही तर यादोघांबरोबर दीपिका पदुकोण आणि चित्रगंदा सेन या दोन देसी गर्ल्सही येतायत. रोहित धवनच्या देसी बॉईज या सिनेमात ही चौकडी बॉक्स ऑफीसवर धमाल करणार आहे.
 
निक माथूर आणि जेरी पटेल या दोन तरुणांची कहाणी म्हणजे 'देसी बॉईज' हा सिनेमा. कमी वेळात जास्तीत जास्त सक्सेस मिळवण्यासाठी या दोघांची सुरु असलेली धडपड या सिनेमात पहायला मिळेल. या सिनेमाला संगीत दिलंय प्रीतमने, तर कोरिओग्राफी केली आहे, बॉस्को सिझरने. 'गरम मसाला'नंतर अक्षय जॉन बऱ्याच वर्षांनी एकत्र आलेत.
 
देसी बॉईडसह 'डॅम 999' ही फिल्मही फ्रायडेला रिलीज होतोय. सायन्स फिक्शनवर आधारित ही फिल्म आहे. आशीष चौधरी आणि रजत कपूर या फिल्ममध्ये दिसणार आहेत. इंग्रजी आणि हिंदीत हा सिनेमा रिलीज होतोय...
 
देसी बॉईज या हिंदी फिल्मबरोबर 'हॅलो जयहिंद' हा मराठी सिनेमाही रिलीज होतोय. २६/११ ची पार्श्वभूमी या सिनेमाला आहे. २६/११च्या घटनेला ३ वर्ष पुर्ण होत असतांना अनेक निरपराधांचे बळी घेणारा आरोपी कसाब आजही जिवंत कसा ? या प्रश्नावर 'हॅलो जयहिंद'मधून प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न दिग्दर्शक गजेंद्र अहिरेंनी केलाय. या सिनेमातून नितीन चंद्रकांत देसाई पहिल्यांदाच लीड रोलमध्ये दिसतील. शिवाय केदार शिंदे, तृप्ती भोईर, रविंद्र मंकणी, विभावरी देशपांडे, यतिन कार्येकर यांच्याही महत्त्वपुर्ण भूमिका सिनेमात आहेत. इलायराजाने या सिनेमाला संगीत दिलंय.
 
'पारंबी' हा दुसरा मराठी सिनेमाही या फ्रायडेला रिलीज होतोय.  शहरातून शिक्षण घेऊन आलेला तरुण आपल्या गावाचा विकास कसा घडवतो आणि हा विकास घडवताना त्याला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं याचं चित्रण पारंबीमध्ये कऱण्यात आलंय. भूषण प्रधान, सई लोकूर या सिनेमात मेन लीडमध्ये आहेत.

First Published: Thursday, November 24, 2011, 05:44


comments powered by Disqus