न्यूड होण्याच्या सामन्यात कोण जिंकणार? - Marathi News 24taas.com

न्यूड होण्याच्या सामन्यात कोण जिंकणार?

www.24taas.com, मुंबई
 
बॉलिवुड आता हॉलिवुड प्रमाणे आता बिनधास्त होत आहे. सध्या बॉलिवुडमध्ये पदार्पण करणाऱ्या नव्या तारका आपल्या हॉट इमेज आणि प्रेझंटेशनमुळे बॉक्स ऑफिसवर धमाल करण्याच्या प्रयत्नात आहेत. या कॅटेगरीमध्ये सनी लिऑन, पाउली दाम सारखी अनेक नावं यापूर्वीच चर्चेत आली असून आता यांच्या पंक्तीत आपल्या बेधडक स्वभावामुळे नेहमी चर्चेत असलेल्या पूनम पांडेही येऊन बसली आहे.
 
 
सध्या तीन अभिनेत्रींमध्ये हॉट सीन देण्यावरून आणि बोल्ड दिसण्यावरून स्पर्धा रंगली आहे.
 
 
पूनम पांडेने केलेल्या दाव्यावर आपण विश्वास ठेवला तर तीने एक फिल्म साइन केली आहे. या बयेच्या मते ३० चित्रपट नाकारल्यानंतर ३१ व्या चित्रपटाला पदार्पणासाठी तिने निवडले आहे. त्यामुळे आता तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या चित्रपटात पूनम पांडे खूपच बोल्ड सीन्स देणार आहे. हा चित्रपट तिच्या आयुष्यावर अवलंबून आहे.
 
 
दुसरीकडे पाउली दाम ही बोल्ड सीनबाबत सर्व रेकॉर्ड तोडल्यानंतरच ऐकणार आहे. विक्रम भट्ट यांचे फाइंड असलेली पाउली दाम हिने हेट स्टोरी या आपल्या पहिल्या चित्रपटात दिलेल्या बोल्ड सीन्समुळे कहर माजवला आहे. या चित्रपटात पाउली दाम हीने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट पहिला सेमीपॉर्न ठरणार आहे.
 
 
सनी लिऑन तर कॅनडाची प्रसिद्ध पॉर्न स्टार आहे. बिग बॉस या रिअलिटी शोमध्ये झळकलेल्या सनी लिऑनला महेश भट्ट यांनी जिस्म २ साठी साइन केले आहे.  आतापर्यंत या चित्रपटाचे प्रोमो झळकले नाहीत, परंतु चित्रपटासंबंधी आलेले वक्तव्य आणि ट्विटरवर प्रसिध्द झालेल्या फोटोंवरून सनीने बोल्ड सीन देण्यासाठी मन बनवलं आहे.

First Published: Friday, April 20, 2012, 19:06


comments powered by Disqus