गोवा चित्रपट महोत्सव उद्घाटन शाहरूखच्या हस्ते - Marathi News 24taas.com

गोवा चित्रपट महोत्सव उद्घाटन शाहरूखच्या हस्ते


झी २४ तास वेब टीम, गोवा
 
४२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात सुरुवात झाली. मडगावातील रविंद्र भवनात किंगखान शाहरूख खानच्या हस्ते रंगारंग कार्यक्रमात या महोत्सवाचं शानदार उदघाटन झालं. मनोरंजनाच्या माध्यमातून कमर्शिअल चित्रपट, समाज जाणीवा जागृत करत असल्याचं त्यानं यावेळी म्हटलं. या उदघाटन समारंभाला केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अंबिका सोनी,
 
गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत, दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणी यांनी उपस्थिती लावली. यावेळी देशभरातील लोकनृत्यांनी उदघाटन सोहळ्यात रंगत आणली. दहा दिवस चालणाऱ्या यासोहळ्यात जगभरातील २००हून अधिक चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

First Published: Thursday, November 24, 2011, 17:52


comments powered by Disqus