Last Updated: Wednesday, April 25, 2012, 15:25
www.24taas.com,मुंबई बऱ्याचदा वाद ओठवून घेणाऱ्या पूनम पांडेने कॅनडाची पॉर्न स्टार सनी लिओनला जबरदस्त टक्कर देण्याचे ठरविले आहे. सनी लिऑन प्रमाणे पॉर्न स्टार म्हणून ख्याती मिळावी म्हणून पूनम पांडेची उठाठेव सुरू आहे. त्यासाठी आता पूनम पांडेने ‘आय एम 18’ हा चित्रपट साइन केला आहे.
सनी लिऑनने जिस्म-२ साठी किती रक्कम घेतली हे अद्याप समजले नसले तरी पूनम पांडे हीने चित्रपट निर्मात्यांकडून तब्बल एक कोटी रुपये उकळले आहेत.
पूनमच्या पहिल्या चित्रपटाचे वैशिष्ट म्हणजे जिस्म या चित्रपटाचे दिग्दर्शक अमित सक्सेनाच पूनमच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.
पूनम पांडेचा जलवा आपल्याला येत्या डिसेंबरमध्ये म्हणजे जिस्म-२ जेव्हा रिलिज होणार आहे, त्याच महिन्यात पाहायला मिळणार आहे. पूनम या चित्रपटासाठी खूपच उत्साहित आहे. यात अधिकाधिक हॉट सीनद्वारे सनी लिऑनला मागे टाकण्याचे पूनमचे प्रयत्न असणार आहे.
.
First Published: Wednesday, April 25, 2012, 15:25