'जंजीर'मध्ये सनीचं 'आयटम साँग' - Marathi News 24taas.com

'जंजीर'मध्ये सनीचं 'आयटम साँग'

www.24taas.com, मुंबई
 
सनी लिऑनचं मायदेशी आल्यापासून नशीबच फळफळलंय. बिग बॉसच्या पाचव्या सिझनमध्ये आली, तेव्हा देशभरात गहजब माजलेला. पण सनीच्या अदांनी सगळेच घायाळ झाले. या ऍडल्ट फिल्म ऍक्ट्रेसला इथे पैसा, प्रसिद्धी मिळालीच. पण, त्याशिवाय नवी ओळख आणि मानही मिळू लागलाय.
 
बिग बॉसमध्ये असतानाच महेश भट्ट यांनी सनीला जिस्म-२साठी साईन केलं. ‘जिस्म-२’चं शुटिंग सुरू होतं ना होतं, तोच एकता कपूरनेही सनी लिऑनला आपल्या आगामी ‘रागिनी एमएमएस-२’ साठीही करारबद्ध केलं. आल्या आल्याच दोन बिग बॅनरच्या फिल्म्समध्ये काम मिळाल्यावर आता बहुचर्चित ‘जंजीर’च्या रिमेकमध्येही सनी आयटम साँग करणार आहे.
 
अमिताभ बच्चन यांनाअँग्री यंग मॅनची ओळख देणाऱ्या १९७० सालच्या जंजीरचा लवकरच रिमेक येत आहे. या सिनेमातून दक्षिणेतील सुपरस्टार चिरंजिवी यांचा मुलगा राम चरण हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. राम चरणसोबत या सिनेमात प्रियंका चोप्राची अदाकारीही पाहायला मिळणार आहे. याशिवाय ‘मोना डार्लिंग’च्या भूमिकेत माही गिल चमकणार आहे. तीदेखील या सिनेमात एक आयटम साँग करणार आहे. पण याशिवाय एका खास आयटम साँगसाठी सनी लियॉनचं नृत्य या सिनेमात पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारचं आयटम साँग सनी पहिल्यांदाच करणार आहे. त्यामुळे सनी लियॉनच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.

First Published: Wednesday, April 25, 2012, 21:00


comments powered by Disqus