बॉलिवूडमध्ये नक्की काय चाललंय? - Marathi News 24taas.com

बॉलिवूडमध्ये नक्की काय चाललंय?

www.24taas.com, मुंबई
 
 
अनिल कपूर आणि अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला ‘तेज’ हा सिनेमा या आठवड्यात रिलीज होतोय.. या सिनेमात प्रेक्षकांना अँक्शन सिक्वेन्स, स्टंट्सची मेजवानी मिळणार आहे.. बाईक, गाडी, टॅक्सी यांचा वापर या सिनेमातल्या स्टंट्ससाठी करण्यात आलाय.. अनिल कपूर या सिनेमात एका पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.
 
 
प्रियदर्शनने कॉमेडीचा साथ सोडून आता एका थ्रिलर चित्रपटाचा निर्माण केला असून त्याचे नाव ‘तेज’आहे. हे चित्रपट २०१२ मध्ये रिलीज होणाऱ्या मोठ्या चित्रपटातील एक असेल असा कयास लावण्यात येत आहे. अजय देवगण, अनिल कपूर, जायद खान, कंगना, समीरा रेड्डी आणि बोमन इराणी सारख्या कलाकारांनी काम केले आहे. हा चित्रपट २७ एप्रिला रिलीज  होत आहे.
 
 
'नो एन्ट्री' या बॉलिवूडच्या हिंदी सिनेमाचा मराठीत रिमेक येणार आहे... नुकतंच या सिनेमातल्या गाण्याचं रेकॉर्डिंग अनु मलिकच्या आवाजात करण्यात आलं.. यावेळी हिंदीतल्या नो एन्ट्री सिनेमाचे निर्माते बोनी कपूर आणि दिग्दर्शक अनीस बझ्मी यांनी विशेष उपस्थिती लावली.
 
 

अयान मुखर्जीच्या आगामी सिनेमात सलमान खान आयटम नंबर करणार असल्याची शक्यता आहे.. या सिनेमात रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत आहे.. विशेष म्हणजे याआधी सलमानच्या चिल्लर पार्टी सिनेमात रणबीर कपूरने आयटम नंबर केला होता.. त्यामुळे या सिनेमात आयटम साँग करण्यास सलमान होकार देऊ शकतो.
 
 
अर्थ, I AM या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका साकारल्यानंतर आता नंदीता दास पुन्हा एकदा आपल्यासमोर येण्यासाठी सज्ज झालीय.. नंदीता दोन सामाजिक फिल्म्स घेऊन प्रेक्षकांसमोर येतेय.. यातली एक फिल्म तामीळ भाषेत असून दुसरी फिल्म हिंदीत असणार आहे.. सामाजिक विषयावरच्या या सिनेमात नंदीता प्रमुख भूमिका साकारतेय
 
 

संजय दत्त आणि अमिताभ बच्चन यांची जोडी अनेक सिनेमांमधून आपण पाहिलीय आणि आता पुन्हा एकदा राम गोपाल वर्मा यांच्या डिपार्टमेंट सिनेमामधून हे दोघे एकत्र दिसणारेयत...त्यामुळे या सिनेमाकडूनही संजय दत्तला खूपच अपेक्षा आहेत.
 
 
बोनी कपूर यांचा बहुचर्चित मिस्टर इंडिया हा सिनेमा लवकरच 3-डी स्वरुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.. श्रीदेवी, अनिल कपूर यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या..विशेष म्हणजे अमरीश पुरी यांचा गाजलेला मोगॅम्बो आता थ्री-डी स्वरुपात प्रेक्षकांना पहाता येणार आहे..
 
 
एक था दिवाना या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री अँमी जॅक्सन आता तेलगु इंडस्ट्रीत आपलं नशीब आजमावणार आहे.. तसं पाहता, अँमीने एका तामीळ सिनेमातून साऊथ इंडस्ट्रीमध्ये आपल्या करीअरची सुरुवात केली होती.. मात्र, आता तेलगु सिनेमात काम करावं लागणार असल्यानं अँमी सध्या तेलगू भाषा शिकतेय.
 
 
ये खुला आसमान या सिनेमाचं म्युझिक लॉन्च गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते पार पडलं.. आनंद-मिलींद यांनी या सिनेमाला संगीत दिलंय.. कुणाल गांजावाला, गायत्री गांजावाला, स्वप्निल बांदोडकर, सुरेश वाडकर यांनी या सिनेमातली गाणी गायलीयेत.. विशेष म्हणजे म्युझिक लॉन्च सोहळ्याच्यावेळी कुणाल गांजावाला यांनी लाईव्ह परफॉर्मन्स दिला.
 
 
चिंटू हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.. या सिनेमाचं म्युझिक लॉन्च मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आलं..संदीप खरेने लिहिलेल्या गीतांना सलील कुलकर्णीने स्वरबद्ध केलंय.. विशेष म्हणजे सलीलचा मुलगा शुभंकर या सिनेमाच्या माध्यमातून गायक म्हणून समोर येतोय.
 
 
फू-बाई-फू या शोचा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणारेय.. मात्र, नुकतंच या पर्वाच्या शेवटच्या भागाचं शुटिंग पार पडलं.. यावेळी कुशल बद्रिके-रसिका आगाशे, सुप्रिया पाठारे-आनंद अभ्यंकर, दिगंबर नाईक- हेमांगी कवी, सतीश तारे-विजय पटवर्धन या चार जोड्यांनी फिनालेपर्यंत मजल मारलीय.
 

First Published: Thursday, April 26, 2012, 11:54


comments powered by Disqus