Last Updated: Friday, April 27, 2012, 17:44
www.24taas.com, मुंबई हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते राजेश खन्ना यांनी काल मुंबईतील लिलावती रुग्णालयात रुटीन चेकअप केल्यानंतर आपल्या घरी परतले आहेत. सध्या ते आपल्या खारदांडा येथील घरी आराम करीत असल्याची माहिती राजेश खन्ना यांचे मॅनेजर यांनी दिली.
काल प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले.राजेश खन्ना यांना सोमवारपासूनच अशक्तपणा आणि थकवा जाणवत होता. खन्ना यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजेश खन्ना यांना दुसऱ्या रुग्णालयात हालविण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राजेश खन्ना यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. तसेच त्यांच्याबरोबर रुग्णालयात पत्नी डिंपल कपाडियाही उपस्थित होत्या.
First Published: Friday, April 27, 2012, 17:44