Last Updated: Saturday, April 28, 2012, 14:16
www.24taas.com,मुंबई ‘धक धक’फेम माधुरी दीक्षित-नेने बॉलीवूडमध्ये दुसरा डाव खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या आधीच्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळी अशी गुलाब नावाच्या ‘गॅँगस्टर’ची प्रमुख भूमिका साकारणार आहे. तर ‘इश्किया’च्या सिक्वलच्या निमित्ताने माधुरी दीक्षित प्रथमच विशालच्या टीमसोबत काम करणार आहे.
अर्थात माधुरीची व्यक्तिरेखा ही दरोडेखोर महिलेची नसून सामाजिक अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या ‘गँग’च्या प्रमुखाची आहे. बॉलीवूडमध्ये पुनरागमनानंतर माधुरी कोणत्या चित्रपटातून झळकणार याची उत्सुकता प्रेक्षकांबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीलाही असून माधुरीची ही ‘गुलाब गँग’ पुढील वर्षी आंतरराष्ट्री महिला दिनी रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. माधुरीने या चित्रपटाच्या आधी ‘देढ इश्किया’ हा विशाल भारद्वाजचा चित्रपट स्वीकारला आहे. सहा स्त्री व्यक्तिरेखा ‘गुलाब गँग’मध्ये असून अनुभव सिन्हा हे चित्रपटाचे निर्माते आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये चित्रपटाचे कथानक घडते. प्रमुख भूमिकेसाठी माधुरी दीक्षितच हवी, असे मत दिग्दर्शक सौमिक सेन यांनी व्यक्त केल्यानंतर माधुरीची भेट घेऊन विचारणा करण्यात आली. अतिशय वेगळी भूमिका साकारायला मिळणार म्हणून माधुरी दीक्षितने लगेच होकार दिला, अशी माहितीही अनुभव सिन्हा यांनी दिली. तर दुसरीकडे निर्माता-दिग्दर्शक-संगीतकार विशाल भारद्वाजमुळे कंगना राणावतचे एक सोनेरी स्वप्न साकार होणार आहे. विशालच्या कंपनीत बनणार्या ‘इश्किया’च्या सिक्वलच्या निमित्ताने माधुरी दीक्षित प्रथमच विशालच्या टीमसोबत काम करणार आहे.
‘इश्किया’च्या सिक्वलमधील आपल्या भूमिकेबाबत कंगना काहीच सांगायला तयार नाही. मात्र ती म्हणाली, खूप लहान असल्यापासून आपण माधुरीचे सिनेमे पाहिले असून कधी काळी आपल्यालाही माधुरीसोबत काम करण्याची संधी मिळेल, असा विचारही आपण कधी केला नव्हता. ‘इश्किया’मध्ये विद्याने साकारलेल्या भूमिकेपेक्षा सिक्वलमधील रोल खूप बोल्ड असल्याचे सांगितले जात आहे.
First Published: Saturday, April 28, 2012, 14:16