Last Updated: Sunday, April 29, 2012, 00:03
www.24taas.com, मुंबई 
अंधेरीच्या हत्याकांडामुळे चर्चेत आलेली मॉडेल रोझलिन खान आता सरसावली आहे ती प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी. 'पेटा' या प्राणी रक्षक संस्थेच्या एका कार्यक्रमात रोझलीन सहभागी झाली. पेटा या संस्थेच्या उपक्रमांत सहभागी होणं म्हणजे सेलिब्रिटींसाठीही प्रतिष्ठेचं मानलं जातं. आणि म्हणूनच आजवर शिल्पा शेट्टी, जॉन अब्राहम, बिपाशा बसू अशा तारे तारकांनी या मंचाचा वापर आपल्या प्रमोशनसाठी करुन घेतला.
असाच प्रयत्न मॉडेल रोझलिन खाननं केला आहे. एका हत्याकांडामुळे चर्चेत आलेली रोझलीन खान पेटाच्या कार्यक्रमात नुकतीच सहभागी झाली. सौदर्य प्रसाधन बनवण्यासाठी प्राण्यांचा वापर केला जातो. तेव्हा सौंदर्य प्रसाधनं वापरणं म्हणजे प्रांण्याची हत्या करण्यासारखंच आहे असा संदेश रोझलिननं दिला तो अनोख्या पद्धतीनं.
पेटा कार्यक्रमाच्या निमित्तानं का होईना रोझलिननं कुप्रसिद्धी पुसत सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमामुळे का होईना रोझलीनच्या पदरी थोडी फार प्रसिद्धी पडेल. हे ही नसे थोडके...
First Published: Sunday, April 29, 2012, 00:03