बिग बींच्या रेखा, सचिनला शुभेच्छा - Marathi News 24taas.com

बिग बींच्या रेखा, सचिनला शुभेच्छा

www.24taas.com, मुंबई
 
अभिनेत्री रेखा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला राज्यसभेसाठी नामनियुक्त सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल महानायक अमिताभ बच्चन यांनी दोघांचे अभिनंदन केले आहे. दोन्ही खासदारपदासाठी लायक असल्याचेही बिग बी यांनी म्हटले आहे.
 
 
बिग बी यांनी सध्या आपल्या आगामी चित्रपट ‘डिपार्टमेंट’साठी कंबर कसली असून त्याच्या प्रमोशनच्या वेळी बिग बींनी रेखा आणि सचिनचे अभिनंदन केले.
 
 
संसदेच्या प्रत्येक सत्रात राष्ट्रपती कला आणि चित्रपट जगतातील काही व्यक्तींचे नाव राज्यसभेसाठी देतात. हे सन्मानाचे पद आहे. यासाठी ज्यांची पण निवड झाली ते त्यासाठी लायक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मला आठवते की, अभिनेत्री नर्गिसही या पदासाठी निवडण्यात आल्या होत्या.
 
 
दरम्यान, पुन्हा चंदेरी पडद्यावर रेखा समवेत काम करण्यात मला कोणतीही अडचण नसल्याचे बिग बी यांनी स्पष्ट केले आहे. एखादी चांगली कथा असली तर आम्ही दोघं एकत्र काम करू शकतो.

First Published: Sunday, April 29, 2012, 11:07


comments powered by Disqus