Last Updated: Monday, April 30, 2012, 23:28
www.24taas.com, मुबंई 
मधुर भांडारकर आणि नितीन देसाई यांच्या खास उपस्थितीत 'दहा डिसेंबर' या मराठी सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला. कांचन अधिकारी निर्मित आणि दिग्दर्शित या सिनेमात प्रतीक्षा लोणकर, शरद पोंक्षे,मृण्मयी देशपांडे आणि नेहा गद्रे हे कलाकार झळकणार आहेत. कांचन अधिकारी निर्मित आणि दिग्दर्शित दहा डिसेंबर या मराठी सिनेमाचा मुहूर्त नुकताच मुंबईत पार पडला.
मधुर भांडारकर आणि नितीन देसाई हे मान्यवर या मुहूर्तासाठी खास उपस्थित होते. प्रतीक्षा लोणकर, शरद पोंक्षे,मृण्मयी देशपांडे, ज्योती सुभाष या सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत तर नेहा गद्रे ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री या सिनेमाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच दिसणार आहे.
आजही पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मुलगी जन्माला आली तर तिचा जो छळ होतो त्या छळाला सामोरी जाणारी स्त्री आणि तिचा संघर्ष या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. कांचन अधिकारींचा हा नवा सिनेमा स्त्रीचे विविध पैलू दाखवणारा ठरेल अशी आशा करूया.
First Published: Monday, April 30, 2012, 23:28