Last Updated: Monday, April 30, 2012, 23:44
www.24taas.com, मुंबई 
४९ व्या राज्य चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याला अनुपस्थित राहिलेल्या कलाकारावंर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला अभिनेत्री माधुरी दीक्षित, दिलीप प्रभावळकर, नितीन देसाई आणि आनंद इंगळे या पुरस्कारप्राप्त कलाकारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या पुरस्कारांना कलाकार उपस्थित राहतात, मात्र सव्वा अकरा कोटी महाराष्ट्राच्या जनतेतर्फे देण्यात येणाऱ्या सरकारी पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहतं नाहीत, हे वागणं बरं नव्हं, अशा शब्दात अजित पावरांनी या कलाकारांना फटकारलं आहे.
माधुरीला राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणारं होतं, तर दिलीप प्रभावळकर यांना व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार जाहीर झाला होता. तर नितीन देसाई यांना कला दिग्दर्शनाचा, तर आनंद इंगळेला विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला होता.
First Published: Monday, April 30, 2012, 23:44