Last Updated: Sunday, November 27, 2011, 15:58
झी 24 तास वेब टीम ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये आमीरच्या लगान सिनेमावर मात करत नो मॅन्स लँड सिनेमाने बाजी मारली होती. आता याच सिनेमाचा निर्माता आणि दिग्दर्शक आमीर खानसह काम करण्यासाठी उत्सुक आहे.

या चंदेरी दुनियेत काहीही होऊ शकतं याची प्रचिती सध्या हॉलीवूड आणि बॉलिवूडमध्ये येते. कारण सध्या आमीर खानला याच अनपेक्षित अशा घटनांचा सध्या सामना करावा लागतो आहे. ज्या नो मॅन्स लँड सिनेमाने आमीरला ऑस्करसारख्या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यामध्ये मात दिली होती आता त्याच सिनेमाचा निर्माता आणि दिग्दर्शक आमीर खानसह काम करण्यासाठी उत्सुक आहे. टायगर्स या आगामी सिनेमामध्ये आमीरने मध्यवर्ती भूमिका करावी अशी त्यांची इच्छा आहे. या सिनेमामध्ये वाघांच्या सद्यपरिस्थितीवर भाष्य करण्यात येणार आहे.
ऑस्कर सोहळ्यामध्ये नो मॅन्स लँड सिनेमासह आमीरचा लगान सिनेमाही स्पर्धेत होता. लगान या सोहळ्यात बाजी मारेल अशी आमीरसह तमाम भारतीयांची अपेक्षा होती. मात्र नो मॅन्स लँडला सर्वोत्कृष्ट सिनेमा जाहिर केल्यानंतर आमीरच्या अपेक्षांवर पाणी फिरलं होतं.
आणि आता याच सिनेमाचा निर्माता आणि दिग्दर्शक आमीरला कास्ट करण्यासाठी उत्सुक आहे म्हटल्यावर आमीरच्या अभिनयाची ही मोठी पावतीच म्हणावी लागेल कारण एखाद्या जगजेत्या सिनेमाच्या निर्माता दिग्दर्शकाने त्याच्याच प्रतिस्पर्धीला सिनेमाची ऑफर देणं या गोष्टी तशा अभावानेच घडताना दिसतात. मात्र आता मिस्टर परफेक्शनिस्ट ही ऑफऱ स्वीकारतो का ? आमीर आपली वैयक्तिक चढाओढ बाजूला सारून कलात्मकतेला अधिक प्राधान्य देतो का हे लवकरच कळेल.
First Published: Sunday, November 27, 2011, 15:58