शिल्पा शेट्टी करणार 'स्टेम सेल्स' जतन - Marathi News 24taas.com

शिल्पा शेट्टी करणार 'स्टेम सेल्स' जतन

www.24taas.com, मुंबई
 
 
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री शिल्पा शेट्टी लग्नानंतर पडद्यावर दिसली नाही तरी ती नेहमी चर्चेत असते. आता ती आई होणार असल्याची बातमी आहे. मात्र, तिचे बाजारातील मूल्य कायम असल्याचे दिसून येत आहे. शिल्पा शेट्टीने आपल्या होणाऱ्या बाळाच्या  'स्टेम सेल्स'चे जतन 'कॉर्डलाईफ'मध्ये करण्याचे ठरवले आहे.
 
 
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची 'कॉर्डलाईफ' या नाळ जतन करणाऱ्या कंपनीच्या ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून  नियुक्ती झाली आहे. शिल्पादेखील लवकरच आई होणार आहे, तिनेही आपल्या बाळाच्या  'स्टेम सेल्स'चे जतन  'कॉर्डलाईफ'मध्ये करण्याचे ठरवले आहे.
 
 
पालकत्वाचा विचार करण्यापूर्वी स्टेम सेल बॅंकिगविषयी माहिती मिळवणे गरजेचे आहे, असे शिल्पाचे म्हणणे आहे. एक जबाबदार पालक म्हणून जशी ठराविक रक्कम मुलाच्या नावे ठेवली जाते. तशीच ही पुंजीसुद्धा मुलाला अडीनडीच्या वेळी नव्या आयुष्याची संजीवनी देणारी आहे, असे ती सांगते.

First Published: Thursday, May 3, 2012, 15:26


comments powered by Disqus