माधुरीला आंबा खावासा वाटतोय! - Marathi News 24taas.com

माधुरीला आंबा खावासा वाटतोय!

www.24taas.com, मुंबई
 
 
अभिनेत्री माधुरी दीक्षितने बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवले. मात्र, लग्नानंतर अमेरिकेची वाट धरली. परंतु तिथे मन न रमल्याने ती पुन्हा भारतात परतली. आता मुंबईत आल्यानंतर तिला आंबा (हापूस) खावासा वाटत आहे.  दोन मुलांची आई झाल्यानंतर माधुरीला  आंबा खायचे आहे, हे खुद्द माधुरीने टि्वट केले आहे.
 
 
आता आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. हा हंगाम मी कसा काय विसरणार? मला हापूस खायला खूप आवडते. मी मनसोक्त आंब्यावर ताव मारणार आहे. ४४ वर्षीय माधुरीला स्थानिक आंब्याचा आस्वाद आठवण करून देत आहे. डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यानंतर माधुरी अमेरिकेत राहायला गेली. आता ती पुन्हा मुंबईत पती श्रीराम आणि मुले अरिन, रायन यांच्या सोबत राहत आहे.
 
 
माधुरीचं आजोळ कोकणातील रत्नागिरी. ती वेळात वेळ काढून रत्नागिरीत जात असे. 'हापूस'  हा रत्नागिरीतील प्रसिद्ध आंबा आहे. त्यामुळे ती आंब्याच्या प्रेमात पडली तर नवल नव्हे. त्यामुळे तिने आंब्याबाबत आपले मत तिने  टि्वट  केले आहे.तसेच  देढ इश्कीया आणि गुलाब गॅंग या दोन सिनेमांचा करार माधुरीने आधीच केला आहे.  विशाल  भारद्वाजच्या देढ इश्कीयाच विद्या बालनने चांगली भूमिका केली होती. त्याचा सामना आता माधुरीला करावा लागणार आहे.

First Published: Thursday, May 3, 2012, 17:48


comments powered by Disqus