विद्या बालनचे 'क्लीन पिक्चर' - Marathi News 24taas.com

विद्या बालनचे 'क्लीन पिक्चर'

www.24taas.com, नवी दिल्ली 
 
उलाला...म्हणत 'डर्टी पिक्चर' गाजवणाऱ्या विद्या बालन आता स्वच्छतेचे धडे देणार आहे. विद्या बालन आता 'क्लीन पिक्चर' साकारणार आहे. विद्याला केंदीय ग्रामविकास मंत्रालय 'क्लीन पिक्चर' निर्माण करण्यासाठी 'ब्रँड अॅम्बेसिडर' म्हणून निवड केली आहे.
 
 
देश भरात आजही अर्ध्याहून अधिक जनतेला उघड्यावर प्रातर्विधी उरकावे लागतात. ही लाजिरवाणे वास्तव बदलण्यासाठी केंदीय ग्रामविकास मंत्रालयाने मोहीम उघडली आहे. या संबंधातील जनजागृती करण्यासाठी विद्या बालनची निवड करण्यात आली आहे! विद्याच्या गाजलेल्या 'द डर्टी पिक्चर'च्या चित्रपटाचा संदर्भ घेऊन, 'हा क्लीन पिक्चर आहे,' असे वक्तव्य या खात्याचे मंत्री जयराम रमेश यांनी केले. विद्याच्या नियुक्तीनंतर उघड्यावर प्रातर्विधीविरोधातील मोहीम ही एक राष्ट्रीय चळवळ होईल, असा विश्वासही व्यक्त केला.
 
 
स्वच्छतेचे धडे देण्यासाठी  'ब्रँड अॅम्बेसिडर' झालेली विद्या म्हणाली, पडद्यावर 'डर्टी पिक्चर' आणि प्रत्यक्ष जीवनात 'क्लीन पिक्चर' साकारण्याची संधी मिळते यापेक्षा एका अभिनेत्रीला अधिक हवे? माझी ही 'भूमिका' नक्कीच यशस्वी होईल, कारण आम्ही एका राष्ट्रीय चळवळीवर काम करीत आहोत. ग्रामीण भागात स्वच्छ पिण्याचे पाणी आणि प्रातविर्धीसाठी शौचालयाची व्यवस्था व्हायला हवी. पाणी नसल्याने शौचकूप वापरले जात नाहीत. विशेषत: हा महिलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. दरम्यान, अभिनेता शाहरुख खान यानेही स्वच्छेसाठीच्या मोहिमेसाठी मदत करण्याचे मान्य केले आहे.  युनिसेफ-डब्ल्यूएचओ'च्या २०१० मधील एका अहवालानुसार, भारतातील ११० कोटी लोकसंख्येपैकी तब्बल ६० टक्के लोक उघड्यावर शौचविधी करतात.
 

First Published: Friday, May 4, 2012, 10:37


comments powered by Disqus