इफ्फी महोत्सवात फराहची नवी भरारी - Marathi News 24taas.com

इफ्फी महोत्सवात फराहची नवी भरारी

झी २४ तास वेब टीम, गोवा
 
गोव्यात सुरु असलेल्या इफ्फी महोत्सवात नुकतीच फराह खानने हजेरी लावली. यावेळी फराहने अनेक गुपीतं उलगडली.
 
बॉलिवूडमध्ये हीट झालेले हे दोन आयटम नंबर्स. या आयटम नंबर्सनी सा-यांनाच थिरकायला भाग पाडलं होतं. मात्र आता आयटम नंबर मध्ये बदल होण्याची गरज असल्याचं फराहने नुकतंच गोव्यात सुरू असलेल्या इफ्फी महोत्सवामध्ये  सांगितलं. इतकंच नाही तर आता आयटम नंबर्स कोरिओग्राफ करण्यापासून ब्रेक घेणार असल्याचं फराहने सांगितलं..
 
त्यामुळे आता फराहच्या पोतडीतून काय नवीन बाहेर पडणार याचीच प्रतिक्षा साऱ्यांना करावी लागणार आहे. कारण की फराह दरवेळेसच नवनवीन देण्याचा प्रयत्न करत असते.

First Published: Monday, November 28, 2011, 07:46


comments powered by Disqus