Last Updated: Thursday, May 10, 2012, 14:35
www.24taas.com, औरंगाबाद 
नितीन चंद्रकांत देसाई निर्मित आणि दिग्दर्शित अजिंठा सिनेमाच्या उद्याच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह लागलं आहे. सिनेमाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सेन्सॉर बोर्डानं सर्टिफिकेट दिल्यानंतरच सिनेमाबाबत निर्णय देणार असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.
तसंच उद्यादेखील याबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळं सेन्सॉर बोर्डाचे सदस्य आज अजिंठा चित्रपट पाहणार असून सेन्सॉर सर्टिफिकेट देण्याबाबत निर्णय घेणार आहेत. अजिंठामधील काही दृश्यांवर बंजारा समाजानं आक्षेप घेतला आहे.
तसंच त्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यामुळं हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सेन्सॉर बोर्डानं आजच सर्टिफिकेट दिलं तर उद्या कोर्ट निर्णय देऊ शकेल. त्यामुळं चित्रपटाच्या उद्याच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह कायम आहे.
First Published: Thursday, May 10, 2012, 14:35