Last Updated: Thursday, May 10, 2012, 16:30
www.24taas.com, मुंबई हिंदी सिनेमासृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनी आमिर खान आणि त्याच्या सत्यमेव जयते या टीव्ही कार्यक्रमाचं कौतुक केलं आहे. समाजातील प्रश्न इतक्या संवेदनशील पद्धतीने मांडून लोकांना त्यावर विचार करायला लावल्याबद्दल दिलीप कुमार यांनी आमिरचं अभिनंदनही केलं आहे.
गेल्या रविवारी जेव्हा स्टार प्लसवर सत्यमेव जयतेच्या पहिल्या भागाचं प्रसारण दाखवण्यात आलं, तेव्हापासूनच आमिरवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिलीप कुमार यांनी ट्विटरवर आमिरची तारीफ करताना लिहीलं आहे, “प्रिय आमिर, तुझ्या टीव्ही शोबद्दल तुझी कितीही तारीफ केली, तरी ती कमीच ठरेल. आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो.”
८९ वर्षीय दिलीप कुमार यांची प्रकृती सध्या बिघडली आहे. मात्र आपली तब्येत उत्तम आहे, असंच त्यांनी ट्विटरवर लिहीलं आहे. “देवाच्या कृपेने माझी प्रकृती ठीक आहे. माझं सगळं व्यवस्थित चाललं आहे. धन्यवाद” असं दिलीप कुमार यांनी ट्विट केलं आहे.
First Published: Thursday, May 10, 2012, 16:30