भगवान शंकरावर हॉलिवूडमध्ये चित्रपट,The Immortals Of Meluha set for a Hollywood adaptation

भगवान शंकरावर हॉलिवूडमध्ये चित्रपट..

भगवान शंकरावर हॉलिवूडमध्ये चित्रपट..
www.24taas.com , झी मीडिया,

शिवा ट्रायोलॉजीचा लेखक अमिष त्रिपाठीच्या इमॉर्टल ऑफ मेलुहा या पुस्तकाचे चित्रपटात रूपांतर होणार आहे. करण जोहर हा चित्रपट बनवणार आहे, तुम्हाला हे माहीत असेलच, पण करण जोहरच्या नंतर हॉलिवूड इंडस्ट्रीला शिवा कथानकाची भुरळ पडली आहे.

अमेरीकेतील एक मोठ्या कंपनीसोबत आपण करार केल्याचे अमिष त्रिपाठीने मान्य केलय. जयपूर येथील साहित्य संमेलनात त्याने पीटीआयशी बोलताना ही बाब स्पष्ट केलीय. मात्र अमिषनं हॉलिवूडच्या कंपनीचे नाव गुलदस्त्यात ठेवल आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीत बदल होतो आहे. चित्रपटात कलाकारांपेक्षा कथेला महत्व प्राप्त झाल आहे. कलाकारानाही सशक्त कथा हवी आहे. असं मत व्यक्त केल.

आपल्या कथेसाठी १० लाख मानधन घेणारे अमिष त्रिपाठी पुस्तक प्रकाशन विश्वात चर्चेत आहेत. आणि यापूर्वीच त्यांचे इमॉर्टल ऑफ मेलुहा २०१०, द सिक्रेट ऑफ नागाज् २०११ आणि ओथ ऑफ वायुपुत्रा २०१३ ह्या पुस्तकाना जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. अमिषची तुलना प्रसिध्द ब्राझिलीयन लेखक पाउलो कोहलोशी होऊ लागली आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 24, 2014, 15:30


comments powered by Disqus