Last Updated: Monday, September 23, 2013, 15:02
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमहानायक अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द लंचबॉक्स’ या चित्रपटाची प्रशंसा केलीय. ते म्हणतात,’हा चित्रपट संवेदनशील प्रेक्षकांसाठी आहे’. या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश बत्रा यांचं असून इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि निमरत कौर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘द लंचबॉक्स’ मी बघितला आणि जाणवलं की, हा चित्रपट कलेच्या जाणकार दर्शकांसाठी आहे’, असं ट्विट शनिवारी अमिताभ बच्चन यांनी केलंय.
‘द लंचबॉक्स’ ही एक हलकीफुलकी प्रेमकथा आहे. दोन अनोळखी व्यक्तिमध्ये लंचबॉक्स च्या माध्यमातून प्रेम कशाप्रकारे फुलत जातं, याचं चित्रण या चित्रपटात आहे. चित्रपटाचे निर्माते करण जौहर आणि अनुराग कश्यप हे आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, September 23, 2013, 13:42