श्रीमंतीत टॉम क्रूझला शाहरुखनं टाकलं मागेThe world`s second-richest actor Shah Rukh Khan

श्रीमंतीत टॉम क्रूझला शाहरुखनं टाकलं मागे

श्रीमंतीत टॉम क्रूझला शाहरुखनं टाकलं मागे
www.24taas.com, वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

हॉलिवूडवर पुन्हा एकदा बॉलिवूड भारी पडलंय. याचं कारण ठरलाय बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान... हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील सर्वाधिक श्रीमंत कलाकारांच्या यादीत अभिनेता शाहरुख खान यानं हॉलिवूडचा प्रख्यात अभिनेता टॉम क्रूझ आणि जॉनी डेप यांना मागं टाकून अव्वल स्थान पटकावलंय. आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स टीमचा मालक असलेला ४८ वर्षीय शाहरूखनं आतापर्यंत ५०हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलंय.

शाहरुख `वेल्थ-एक्स` यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची संपत्ती ६० कोटी डॉलर नोंदविण्यात आली आहे, तर कॉमेडियन जेरी साइनफिल्ड हा श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याची संपत्ती ८२ कोटी डॉलर आहे. टॉम क्रूझ तिसऱ्या स्थानावर असून, त्याची संपत्ती ४८ कोटी डॉलर आहे.

टायलेर पेरी आणि जॉनी डेप पाचव्या स्थानावर असून, त्यांची संपत्ती प्रत्येकी ४५ कोटी डॉलर आहे. त्या खालोखाल जॅक निकल्सन (४० कोटी डॉलर), टॉम हँक्स (३९ कोटी डॉलर) आणि क्लिंट ईस्टवूड (३७ कोटी डॉलर) यांचा क्रमांक लागतो. यादी करताना मालमत्तेचं मूल्य विचारात घेण्यात आलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 21, 2014, 19:50


comments powered by Disqus