विद्या बालनचं पहिलं लग्न तर पतीचं तिसरं , This is Vidya`s first marriage while the third for Siddharth.

विद्या बालनचं पहिलं लग्न तर पतीचं तिसरं

विद्या बालनचं पहिलं लग्न तर पतीचं तिसरं
www.24taas.com, मुंबई

`डर्टी पिक्चर`मधल्या अभिनयाने सर्वांची मन जिंकून घेणारी विद्या बालन आणि यूटीव्हीचा सीईओ सिद्धार्थ रॉय कपूर नाही नाही म्हणता विवाह बंधनात अडकत आहेत. मात्र, असे असले तरी विद्याचं पहिलं तर सिद्धार्थचं हे तिसरं लग्न आहे.

विद्या आणि सिद्धार्थ या दोघांच्याही अफेअरबाबत इंटस्ट्रीत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. विद्या आणि सिद्धार्थ एकत्र अनेक पार्ट्यांमध्ये, सुट्टीच्या ठिकाणीही फिरताना दिसलेत. सध्या या दोघांच्या लग्नाच्या बातम्या कानावर येत होत्या. त्याला आता पूर्ण विराम मिळाला आहे. हे दोघेही १४ डिसेंबरला मुंबईत लग्नबंधनात अडकणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच विद्याने सिद्धार्थबरोबरच्या रिलेशनशिपच्या बातमीला दुजोरी दिला होता. `मी आणि सिद्धार्थ एकत्र आहोत, हे खरं आहे. मात्र त्याच्यापुढे मी काहीही सांगू शकत नाही`, असे विद्याने म्हटले होते. त्यामुळे चर्चा अधिक रंगली होती. अखेर विद्या आणि सिद्धार्थ हे दोघेही लग्नाच्या तयारीलाही लागले आहेत. त्यांचा संगीत सोहळा दोन दिवसांपूर्वी थाटात पार पडला.

विद्याचे लग्न हे पंजाबी आणि दाक्षिणात्य रितीरिवाजांनूसार होणार आहे. विद्या स्वत : तामिळ असून सिद्धार्थ रॉय पंजाबी असल्याने दोन्ही कुटुंबांच्या संमतीने हा विवाह होणार असल्याचे सांगितले जात आहे . मुंबईतील चेंबूर येथील सुब्रमण्यम् समाजाच्या मंदिरात सकाळच्या मुहुर्तावर विद्या आणि सिद्धार्थ १४ डिसेंबर रोजी तामिळपद्धतीने लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दोन्ही कुटुंबांने हा विवाह सोहळ खासगी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मीडियाने त्यांच्या लग्नाची बातमी लिक केलीच.

First Published: Wednesday, December 12, 2012, 14:44


comments powered by Disqus