`टायगर`ला घेतलंय दत्तक..., Tiger Shroff adopts a tiger

`टायगर`ला घेतलंय दत्तक...

`टायगर`ला घेतलंय दत्तक...

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगरला अभिनयाप्रमाणेच प्राण्यांचीही आवड आहे. अनेक सुंदर आणि ताकदवान पशु-प्राणी त्याला आपल्याकडे आकर्षित करतात. मात्र, प्राण्यांमध्ये आपला नामधारी ‘टायगर’ म्हणजेच वाघ त्याला अत्यंत प्रिय आहे.

सध्या दिवसेंदिवस घटत जाणारी वाघांची संख्या ही चिंतेचा विषय बनलीय. यामुळचे, टायगरही व्यथित झालाय... वाघांसाठी आपणही काहीतरी करावं, असं त्याला वाटत होतं. त्यामुळेच, टायगरनं कायदेशीररतिय् नागपूरच्या महाराजबाग राष्ट्रीय प्राणी संग्रहालयात राहणाऱ्या एका चार वर्षांच्या वाघाला दत्तक घेतलंय. टायगरनं या वाघाचं नाव ‘जान’ असं ठेवलंय.

‘टायगरमध्ये सौंदर्य, निर्भयता आणि शक्तीचं अद्वितीय असं मिश्रण पाहायला मिळतं... त्यांच्याकडे लक्ष देणं आपलं कर्तव्यच आहे’ असं टायगरनं म्हटलंय. वाघांच्या संरक्षणासाठी त्यांना दत्तक घेणं म्हणजे वन्य जीव संरक्षण योजनेचं समर्थन करण्याचा उत्तम पर्याय आहे, असं टायगर म्हणतोय.

टायगर श्रॉफ याचा ‘हिरोपन्ती’ लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 15, 2014, 14:40


comments powered by Disqus