`टाइमपास`ची रेकॉर्डब्रेक कमाई, जल्लोषात सक्सेस पार्टी , `Timepass` to break record earnings, Success

`टाइमपास`ची रेकॉर्डब्रेक कमाई, जल्लोषात सक्सेस पार्टी

`टाइमपास`ची रेकॉर्डब्रेक कमाई, जल्लोषात सक्सेस पार्टी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

टाइमपास या मराठी सिनेमाने ३० कोटींच्या वर कमाई करत मराठी सिनेमांच्या गल्ल्यात एक मोठी भर टाकली. या रेकॉर्डब्रेक कमाईने मराठी सिनेसृष्टीत एक इतिहास देखील रचला.याच निमित्ताने टाइमपासच्या टीमने जोरदार जल्लोषात सक्सेस पार्टी आयोजित केली.

या पार्टीच्यावेळी टाइमपासच्या डीवीडीचं लाँचिंग देखील करण्यात आलं. यात दुनियादारी या आणखी एक हिट ठरलेल्या सिनेमाच्या टीमने हजेरी लावत टाईमपासला रेकॉर्ड ब्रेक ची ट्रॉफी देऊन त्यांच्या आनंदात आणखीनच भर टाकली.

एसेल व्हिजनचा टाइमपास हा सिनेमा नवा इतिहास रचतोय. एका आठवड्यातच या फिल्मनं १४ कोटींचा पल्ला गाठलाय. त्यात विकेंडला सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहता, फिल्मच्या शोमध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातभरात मिळालेल्या प्रेक्षकांच्या तूफान प्रतिसादामूळे, सिनेमाच्या शोमध्ये जवळजवळ २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली होती.

सिनेमाला मिळत असलेल्या उदंड प्रदिसादामुळे शोच्या वाढत्या संख्येसोबतच राज्यभरातल्या सिनेमागृहांच्या संख्येतही वाढ होतालो दिसतेय. त्यामुळे मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही हा समजही टाइमपासमनं चुकीचा ठरतोय. या सिनेमाने ३० कोटींच्या वर कमाई करत मराठी सिनेमांच्या गल्ल्यात एक मोठी भर टाकली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Thursday, February 6, 2014, 20:39


comments powered by Disqus