पाहा ट्रेलर : `कोचाडीयन` रजनीचा डबल अवतार, trailer : kochadaiyaan

पाहा ट्रेलर : `कोचाडीयन` रजनीचा डबल अवतार

<B> <font color=red>पाहा ट्रेलर :  </font></b> `कोचाडीयन` रजनीचा डबल अवतार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`सुपरस्टार` रजनीकांतच्या फॅन्ससाठी ही एक खुशखबर... रजनीकांतचा बहुचर्चित फोटो रिअॅलिस्टिक टेक्नोलॉजीवर आधारीत थ्रीडी सिनेमा `कोचाडियन` या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय.

या सिनेमाचं वैशिष्ट्यं म्हणजे रजनीकांतची डबल धम्माल या सिनेमात आहे. कारण, रजनीकांत या सिनेमात डबल रोल करताना दिसेल. तसंच पहिल्यांदाच दीपिका पादूकोण रजनीकांतची हिरोईन म्हणून दिसणार आहे.

या सिनेमाचा ट्रेलर आणि फिल्म-मेकिंग व्हिडिओ नुकताच चेन्नईमध्ये दाखवण्यात आला. कार्यक्रमादरम्यान सुपरस्टार शाहरुख खानसहीत अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते.

या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय रजनीकांतच्या मुलीनं... सौंदर्यानं रजनीकांत अश्विननं... तर या सिनेमाला म्युझिक दिलंय ए. आर. रेहमाननं... या सिनेमावर टेक्नॉलॉजीसाठी रिलीजपूर्वीच भरपूर चर्चा रंगतेय. हा सिनेमा बनवण्यासाठी रजनीकांतला दोन वर्षांचा कालावधी लागलाय. हा सिनेमा येत्या ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.


व्हिडिओ पाहा -






इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 10, 2014, 19:32


comments powered by Disqus